संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्र्यांकडून देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी स्पर्धेत उतरण्यासाठी खासगी क्षेत्राला संरक्षणमंत्र्यांकडून मान्यता

Posted On: 16 JUL 2019 3:27PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 16 जुलै 2019

 

संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन देणारा निर्णय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या संरक्षणमंत्री पुरस्कारासाठी स्पर्धेत उतरण्याकरिता संरक्षणमंत्र्यांनी खासगी क्षेत्राला परवानगी दिली आहे. यापूर्वी या वार्षिक पुरस्कारासाठी केवळ आयुध कारखाने आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्र एकके (डीपीएसू) यांच्यातच स्पर्धा असे. कुठल्याही राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार स्पर्धेस खासगी क्षेत्र पात्र नव्हते.

या निर्णयामुळे संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात औद्योगिक पाया विस्तारण्यास मदत होईल. तसेच देशी आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सर्वोत्कृष्ट भारतीय फर्म्स शोधण्यात सहाय्य मिळेल. भारतीय संरक्षण उद्योगाच्या, विशेषत: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व स्टार्ट-अप्सच्या निर्यात क्षेत्राला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

पुरस्कारासाठीची नामांकने ऑनलाईन आमंत्रित केली जातील. यासाठी वेबपोर्टल विकसित केले जाईल. विस्तृत माहिती https://www.ddpmod.gov.in, http://makeinindiadefence.gov.in आणि http://www.dgqadefence.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

 

S.Tupe/S.Kakade/P.Kor

 


(Release ID: 1578901) अभ्यागत कक्ष : 79
Read this releasein: English