वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जूनमध्ये घाऊक किमत निर्देशांकात 0.2 टक्क्यांनी वाढ

Posted On: 15 JUL 2019 3:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 15 जुलै 2019

 

सर्व व्यापारी वस्तुंचा घाऊक किंमत निर्देशांक जून 2019 महिन्यात 121.2 वरून 121.5 पर्यंत पोहचला असून 0.2 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. घाऊक किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर जून 2019 मध्ये 2.02 टक्के (तात्पुरती आकडेवारी) राहिला. त्याआधीच्या महिन्यात तो 2.45 टक्के (तात्पुरती आकडेवारी) होता. जून 2018 मध्ये तो 5.68 टक्के होता.

प्राथमिक गट (22.62 टक्के)

या गटाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 1.4 टक्के वाढ होऊन तो 141.4 (तात्पुरती आकडेवारी) झाला.

‘अन्नपदार्थ’ गटाचा निर्देशांक याआधीच्या महिन्याच्या तुलनेत 1.1 टक्के वाढ होऊन तो 151.7 (तात्पुरती आकडेवारी) झाला. सागरी मासे (6 टक्के), डुकराचे मांस, तूर, बार्ली, वाटाणे/चवळी आणि मूग (प्रत्येकी 4 टक्के), फळे आणि भाजीपाला (3 टक्के), गोमांस आणि म्हशीचे मांस, मसूर आणि मका (2 टक्के), मटण, मसाले, राजमा आणि तांदूळ (1 टक्के) यांच्या किमतीत वाढ झाली. विड्याची पाने (26 टक्के), चहा (2 टक्के), नाचणी आणि पोल्ट्री चिकन (1 टक्के) यांच्या किमतीत घट झाली.

‘अखाद्य वस्तू’ गटाच्या निर्देशांक 0.7 टक्के वाढून 128.7 (तात्पुरती आकडेवारी) झाला. कच्चे रबर (12 टक्के), चारा (5 टक्के), भूईमुगाच्या शेंगा (4 टक्के), मोहरीच्या बिया आणि सोयाबीन (2 टक्के), कच्चे रेशीम, कापूस बिया (1 टक्का) यांच्या किमतीत गेल्या महिन्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. फुलझाडे आणि नारळ (3 टक्के), एरंडेल बिया (2 टक्के), कच्चे ताग, औद्योगिक लाकूड आणि सूर्यफूल (1 टक्के) यांच्या किंमतीत घट झाली आहे.

‘खनिजे’ गटाच्या निर्देशांकात 14.5 टक्के वाढ होऊन तो 158 झाला.

कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू गटाच्या निर्देशांकात 0.3 टक्के घट होऊन तो 92.5 झाला.

इंधने आणि ऊर्जा (13.15 टक्के)

या गटाच्या निर्देशांकात 1.3 टक्के घट होऊन तो 102.1 झाला.

तयार उत्पादने (64.23 टक्के)

या गटाच्या निर्देशांकात कोणताही बदल न होता तो 118.4 राहिला.

अन्नधान्यावर आधारित घाऊक किंमत निर्देशांक (24.38 टक्के)

अन्नधान्य गटाच्या घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात घसरण होऊन तो जून 2019 मध्ये 5.04 टक्के राहिला. मे 2019 मध्ये तो 5.10 टक्के होता.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor



(Release ID: 1578738) Visitor Counter : 126


Read this release in: English