वस्त्रोद्योग मंत्रालय

हातमाग तंत्रज्ञान संस्था

प्रविष्टि तिथि: 12 JUL 2019 5:59PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 जुलै 2019

 

ओदिशातल्या बारगढ येथे भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था (आयआयएचटी) असून संस्थेत हातमाग आणि वस्त्रोद्योग तंत्रज्ञानविषयक 3 वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. संस्थेत दरवर्षी 45 विद्यार्थ्यांच्या प्रवेशास परवानगी आहे. संस्था ओदिशा (20 जागा), छत्तीसगड (4 जागा), महाराष्ट्र (13 जागा) आणि तेलंगण (8 जागा) या राज्यातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश पुरवते. भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने आयआयएचटी सालेम (तामिळनाडू) येथे 2015-16 या वर्षापासून ‘हातमाग आणि वस्त्रोद्योग तंत्रज्ञानात बी-टेक’ हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1578592) आगंतुक पटल : 90
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English