आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
वैद्यकीय उपकरणांसाठी कायदा
Posted On:
12 JUL 2019 5:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2019
वैद्यकीय उपकरणे नियम 2017 हे 1 जानेवारी 2018 पासून अंमलात आले आहेत. वैद्यकीय उपकरणांचे नियमन वैद्यकीय उपकरणे नियम 2017 आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 या अंतर्गत होते. नियमातल्या तरतुदीनुसार स्वदेशी तसेच आयात वैद्यकीय उपकरणांचे परीक्षण केले जाते.
एखादे अधिसूचित वैद्यकीय उपकरण कायदा आणि नियमातील तरतुदीनुसार योग्य नसल्यास या उपकरणांची विक्री रद्द करण्याच्या उपकरणे रुग्णालयांसह बाजारातून मागे घेण्याचे निर्देश केंद्रीय परवाना प्राधिकरण देऊ शकते.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
B.Gokhale/S.Kakade/P.Kor
(Release ID: 1578586)
Visitor Counter : 110