रसायन आणि खते मंत्रालय

खते अनुदानातील थेट लाभ हस्तांतरणाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ

Posted On: 10 JUL 2019 3:44PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 10 जुलै 2019

 

केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी आज खते अनुदानातील थेट लाभ हस्तांतरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात केली. मार्च 2018 मध्ये देशभरात पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात आली होती.

शासनात पारदर्शकता आणली तरच सरकारला लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता येईल असे गौडा यावेळी म्हणाले.

थेट लाभ हस्तांतरणाचे नवीन उपक्रम

डीबीटी डॅशबोर्ड-देशभरातल्या खतांच्या साठ्याबाबत माहिती या डॅशबोर्डवर मिळेल.

पीओएस सॉफ्टवेअर-बहुभाषिक सुविधेमुळे डीबीटी सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी, लॉग इन आणि विक्रीसाठी आधार वर्च्युअल आयडी पर्याय उपलब्ध असेल.

डेस्कटॉप पीओएस आवृत्ती-खतांच्या विक्रीसाठी अतिवेगवान आणि सुरक्षित असे हे डेस्कटॉप सॉफ्टवेअर आहे.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor



(Release ID: 1578105) Visitor Counter : 124


Read this release in: English