अर्थ मंत्रालय
बँकांच्या जोखिमयुक्त मालमत्ता गुणोत्तर 9 टक्के राखावा लागणार
प्रविष्टि तिथि:
09 JUL 2019 1:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2019
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बँकांना किमान भांडवल आणि जोखीमयुक्त मालमत्ता यांचे गुणोत्तर 9 टक्के राखणे आवश्यक आहे. 31 मार्च 2019 पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी हे किमान गुणोत्तर राखले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय स्थैर्य अहवालानुसार (एफएसआर) अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण घटले आहे. मार्च 2020 पर्यंत सर्व अनुसूचित व्यावसायिक बँकांच्या एनपीए गुणोत्तरात आणखी घट होऊन ते 9 टक्क्यांवर येईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
B.Gokhale/S.Kane/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1577901)
आगंतुक पटल : 257
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English