अर्थ मंत्रालय

बँक सेवा शुल्क

Posted On: 08 JUL 2019 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जुलै 2019

 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बचत खाते धारकांना पुढील किमान मुलभूत सेवा मोफत पुरवल्या जातात.

  1. बँकांच्या शाखांमधे तसेच एटीएम/कॅश डिपॉझिट मशिनमधे रोख रक्कम जमा करणे.
  2. केंद्र/राज्य सरकार/राज्य सरकारी संस्था आणि विभागांनी भरलेल्या धनादेशाद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्राप्त रक्कम.
  3. एका महिन्यात ठेवी भरण्यावर कोणतीही मर्यादा नाही.
  4. एका महिन्यात एटीएमसह किमान चार वेळा पैसे काढणे.
  5. एटीएम कार्ड किंवा एटीएम-कम-डेबिट कार्ड.

मार्च 2019 पर्यंत 57.3 कोटी बचत खातेधारकांना वरील सुविधा मोफत पुरवण्यात आल्या आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 जुलै 2019 पासून NEFT आणि RTGS शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने बँकांना याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवायला सांगितला आहे. यामुळे डिजिटल व्यवहारांना चालना मिळेल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत ग्रामीण भागातल्या बँकांच्या शाखा आणि वित्तीय साक्षरता केंद्रे देशात वित्तीय साक्षरतेसाठी शिबिरांचे आयोजन करत आहेत. जन जागृतीसाठी दृक-श्राव्य माध्यमांचा वापर करण्याची सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेने केली आहे.

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane


(Release ID: 1577800)
Read this release in: English