पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचा वाराणसी दौरा


वाराणसी विमानतळावर लालबहादुर शास्त्री यांच्या पुतळ्याचे केले अनावरण

वाराणसीमधे वृक्षारोपण मोहिमेत सहभाग

Posted On: 06 JUL 2019 6:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसीला भेट दिली आणि अनेक कार्यक्रमात सहभागी झाले.

वाराणसीच्या लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांनी अनावरण केले. त्यानंतर वाराणसीतल्या आनंदकानन वाटीका येथे त्यांनी वृक्षारोपणाचा प्रारंभ केला.

मन महाल इथल्या अभासी संग्रहालयाला पंतप्रधानांनी भेट दिली. दशअश्वमेध घाटाजवळ हे संग्रहालय असून, वाराणसी शहराचा सांस्कृतिक वारसा या संग्रहालयातून मांडण्यात आला आहे.

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 



(Release ID: 1577732) Visitor Counter : 84


Read this release in: English