पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशात आगरा येथे बस अपघातातल्या जिवितहानी बद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त

Posted On: 08 JUL 2019 3:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जुलै 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील आगरा येथे बस अपघातातल्या जिवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान म्हणाले कि, ‘उत्तर प्रदेशातल्या आगरा इथल्या बस दुर्घटनेमुळे व्यथित झालो आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबिंयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन अपघातातल्या पिडीतांना सर्व आवश्यक ती मदत पुरवत आहे.’

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane



(Release ID: 1577729) Visitor Counter : 79


Read this release in: English