अर्थ मंत्रालय
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जीवनमान सुधारण्यावर सरकारचा भर
सोलार स्टोअर आणि बॅटरी चार्जर यांना प्रोत्साहन देण्यासाठी एलईडी बल्ब अभियानाच्या पद्धतीचा वापर
सुरळीत रेल्वे प्रवासासाठी रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाचा मोठा कार्यक्रम सुरू
Posted On:
05 JUL 2019 6:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जुलै 2019
नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. डिजिटल देयके सर्वत्र स्वीकारली जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर हे जीवनमान सुधारण्यासाठी एक सक्षम साधन आहे. केंद्रीय अर्थआणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारमन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प 2019-20 संसदेत सादर करताना हे सांगितले.
सुमारे तीस लाख कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत समाविष्ट झाले आहेत. असंघटित आणि अनौपचारिक क्षेत्रातील 60 वर्षांवरील कामगारांना दर महिना तीन हजार रुपये निवृत्ती वेतन उपलब्ध करून दिले जाण्याचे या योजनेचे लक्ष्य आहे. पंतप्रधानांनी अहमदाबाद येथे 5 मार्च 2019 रोजी या योजनेचे उद्घाटन केले.
उज्वला योजना
जीवन सुलभ करण्यासाठी स्वच्छ वातावरण आणि शाश्वत उर्जेचा वापर कायम ठेवणे महत्त्वपूर्ण असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री यांनी सांगितले. सुमारे 35 कोटी एलईडी बल्ब उज्वला योजनेअंतर्गत वितरित करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या यामुळे वार्षिक 18,341 कोटी बचत झाली आहे. एलईडी मिशनच्या धर्तीवर देशात सौर आणि बॅटरी चार्जर्सच्या वापरला प्रोत्साहन दिले जाईल.
रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण
सामान्य नागरिकांच्या सुलभ रेल्वे प्रवासासाठी या वर्षात रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने एक मोठा कार्यक्रम सुरू केला जाणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले.
G.C/S.Tupe/P.M
(Release ID: 1577555)
Visitor Counter : 117