अर्थ मंत्रालय

जनतेसाठी धोरण आणि कार्यक्रम निश्चित करताना व्यावहारिक-वर्तन अर्थशास्त्र महत्वपूर्ण भूमिका निभावू शकते: आर्थिक सर्वेक्षण


नीती आयोगामध्ये व्यावहारिक -वर्तन अर्थशास्त्राची शाखा स्थापन करावी तसेच प्रत्येक कार्यक्रमाचे ‘व्यावहारिक अर्थशास्त्राचे लेखापरीक्षण’ करण्याची आर्थिक समीक्षणामध्ये प्रस्ताव

Posted On: 04 JUL 2019 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जुलै 2019

 

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेमध्ये 2018-19 चे आर्थिक समीक्षण सादर केले. यामध्ये जनतेसाठी तयार करण्यात येणाऱ्या योजना आणि कार्यक्रम प्रभावी तसंच चांगल्या ठराव्यात यासाठी सल्ले देण्यात आले आहेत. भारतासारख्या देशामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी व्यावहारिक-वर्तन अर्थशास्त्र कशा प्रकारे महत्वाची आणि प्रभावीपणाने भूमिका बजावू शकते, याची विस्तृत चर्चा करण्यात आली आहे.

सामाजिक आणि धार्मिक नियम व्यवहारांना प्रभावित करण्यासाठी  हे  अर्थशास्त्र प्रमुख भूमिका बजावते. वास्तविक लोकांनी घेतलेले निर्णय, पारंपरिक अर्थशास्त्रामध्ये अव्यावहारिक यंत्रमानवाव्दारे बनवलेल्या सिद्धांतापेक्षा वेगळे असतात. याउलट मानवी व्यवहारामध्ये मनोविज्ञानाचा विचार करून व्यावहारिक अर्थशास्त्र लोकांना इच्छेप्रमाणे व्यवहार करण्यासाठी प्रेरणा देवून नवीन दृष्टी प्रदान करते, असे आर्थिक समीक्षणामध्ये नमूद करण्यात आले आहे.

अलिकडच्या काळामध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि स्वच्छ भारत मोहीम यासारख्या लोकप्रिय सरकारी योजना, कार्यक्रमांच्या यशस्वीतेचा हवाला देवून आर्थिक समीक्षणात म्हटले आहे की, समाज माध्यमांवर ‘सेल्फी विथ डॉटर’ हा कल्पक उपक्रम संपूर्ण जगामध्ये लोकप्रिय झाला आणि कन्येच्या जन्मानंतर घरामध्ये आनंद साजरा करण्याचा एक नियमच बनला. आता समाजात जास्तीत जास्त लोक नवजात कन्येचे स्वागत करत आहेत. याचप्रमाणे नमामि गंगे, उज्ज्वला योजना, पोषण अभियान यासारख्या सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख निर्माण करणाऱ्या योजना जनतेमध्ये आपलेपणा निर्माण करण्यासाठी मदत करतात.

स्वच्छता मोहिमेतला ’स्वच्छागृही’ हा शब्द ‘सत्याग्रही’ या शब्दाशी मिळता जुळता आहे. त्याचाही एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचला असं यावेळी नमूद करण्यात आलं.

आर्थिक समीक्षणाच्या दृष्टीकोनातून जिथं अनेक भारतीय कार्यक्रमांनी व्यावहारिक अर्थशास्त्राच्या सिद्धांतांना चांगले लागू केले आहे. आता हे कार्यक्रम अधिक व्यापक आणि प्रभावी बनवून त्याचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीपूर्वी गरजेनुसार त्याचे ‘व्यवहारिक आर्थिक लेखा परीक्षण’ करण्याची आवश्यकता असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

 

 

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane


(Release ID: 1577278) Visitor Counter : 123


Read this release in: English