मंत्रिमंडळ

भारत आणि मालदीव दरम्यान आरोग्य क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 03 JUL 2019 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जुलै 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि मालदीव दरम्यान आरोग्य क्षेत्रातील सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. या करारावर 8 जून 2019 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

 

या करारात पुढील क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे-

  1. डॉक्टर्स अधिकारी आणि अन्य आरोग्य व्यावसायिक आणि तज्ज्ञांचे प्रशिक्षण आणि आदान-प्रदान
  2. वैद्यकीय आणि आरोग्य संशोधन विकास
  3. औषधे आणि वैद्यकीय उत्पादनांचे नियमन आणि त्यावरील माहितीचे आदानप्रदान
  4. संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार ई-आरोग्य आणि टेलिमेडिसिन
  5. परस्पर मंजुरीच्या अन्य क्षेत्रात सहकार्य

या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि सहकार्याची सविस्तर माहिती देण्यासाठी एक कृतिगट स्थापन केला जाईल.

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane



(Release ID: 1576896) Visitor Counter : 155


Read this release in: English