आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशभरातली कर्करोग उपचार केंद्रे

Posted On: 02 JUL 2019 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2019

 

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्य कर्करोग संस्था देशातल्या विविध भागात टीसीसीसी उभारण्यासाठी मदत व्हावी यासाठी केंद्र सरकार, टीसीसी सुविधा योजना बळकट करण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी करत आहे. आतापर्यंत राज्य कर्करोग संस्था उभारण्याचे 16 तर टीसीसीसी उभारण्याचे 20 प्रस्ताव आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.

राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, 27 प्रादेशिक कर्करोग केंद्रे उभारण्यात आली आहेत. नव्या एम्स मधे आणि प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजने अंतर्गत, अद्ययावत करण्यात आलेल्या अनेक संस्थांमधे, कर्करोग विषयक विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामुळे देशात कर्करोगावरचे उपचार आणि प्रतिबंध याविषयी क्षमता वृद्धींगत झाली आहे.

 

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1576722) Visitor Counter : 142


Read this release in: English