कृषी मंत्रालय

पहिले इंडिया कोऑपरेटीव्हज ट्रेड फेअर,(आयआयसीटीएफ) 11 ऑक्टोबरपासून नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानात,


शेतकरी,कारागीर आणि इतर सहकारी सदस्यांना थेट जागतिक व्यापाराशी जोडणारा उपक्रम

Posted On: 01 JUL 2019 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जुलै 2019

 

पहिले भारतीय आंतरराष्ट्रीय सहकारी व्यापार प्रदर्शन आयआयसीटीएफ, नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर येत्या 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान भरवले जाणार आहे. एनसीडीसीच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या प्रदर्शनाला एनईडीएसी ही आंतरराष्ट्रीय संस्था, तीन मंत्रालये, चार राज्य सरकारे आणि सर्वोच्च स्तरावरच्या अनेक भारतीय सहकारी संस्था यांचे सहकार्य यासाठी लाभणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रे, मूल्य शृंखला, दुग्ध,निर्यात, तंत्रज्ञान, हवामान सुसंगत शेती, प्रक्रिया, साठवण, विपणन, विमा, वित्त, आरोग्य, हातमाग, मत्स्य, इत्यादी क्षेत्रांत, स्वयं सहाय्यता गट आणि क्षमता वृद्धीद्वारे, सहकारी ते सहकारी व्यापारावर भर दिला जाणार आहे.

ग्रामीण आणि कृषी समृद्धी वाढवण्यासाठी भारतातल्या आणि परदेशी सहकारी ते सहकारी व्यापाराला प्रोत्साहन देणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

व्यापार जाळे विस्तृत करण्यासाठी, भारतातल्या आणि परदेशातल्या उद्योग आणि व्यवसाय समूहांना यामुळे मोठी संधी प्राप्त होणार आहे.

अधिक माहितीसाठी   www.iictf.in किंवा  www.ictf.co.in या संकेत स्थळावर अधिक माहित उपलबद्ध आहे. तसेच ऑनलाईन नोंदणीही यावर करता येणार आहे.

 

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1576470) Visitor Counter : 140


Read this release in: English