संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख म्हणून के नटराजन यांनी स्वीकारला पदभार
Posted On:
30 JUN 2019 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2019
भारतीय तटरक्षक दलाचे 23वे प्रमुख म्हणून के नटराजन यांनी आज सूत्रं स्वीकारली. भारतीय तटरक्षक दलाच्या पाचव्या तुकडीतले अधिकारी नटराजन, जानेवारी 1984 मधे सेवेत रुजू झाले.
35 वर्षांच्या आपल्या झळाळत्या कारकीर्दीत भारतीय तटरक्षक दलाच्या सर्व श्रेणीतल्या जहाजांचे त्यांनी नेतृत्व केले आहे.
राष्ट्राच्या सेवेबद्दल ध्वजाधिकाऱ्यांना राष्ट्रपती तटरक्षक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

M.Chopade/N.Chitale/D. Rane
(Release ID: 1576375)
Visitor Counter : 110