कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

युवकांना कौशल्य प्रदान

Posted On: 28 JUN 2019 6:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जून 2019

 

स्किल इंडिया मिशन अंतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे युवकांना, लघु आणि दीर्घकालावधीच्या प्रशिक्षणाद्वारे रोजगाराभिमुख कौशल्य प्रदान केली जातात. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत (आयटीआय) दीर्घकालावधीचे प्रशिक्षण दिले जाते. 2014 मधल्या 11,964 आयटीआयवरुन 2019 मधे आयटीआयची संख्या 14,494 झाली आहे, तर 2014-15 मधल्या प्रशिक्षणार्थीच्या 16.9 लाख या संख्येत वाढ होऊन 2018-19 मधे ही संख्या 23.8 लाख झाली.

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1576260) Visitor Counter : 98


Read this release in: English