वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

स्टार्ट अप इंडिया

Posted On: 28 JUN 2019 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जून 2019

 

‘स्टार्ट अप इंडिया’ या उपक्रमाची 16 जानेवारी 2016 ला सुरुवात झाली, त्यात 19 कृती बिंदूचा समावेश आहे. स्टार्ट अप इंडियाला सुरुवात झाल्यापासून 24-6-2019 पर्यंत औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार मंत्रालयाने देशभरातल्या 19,351 स्टार्ट अपना मान्यता देण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

स्टार्ट अप इंडिया अंतर्गत देशामधे महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 3661 स्टार्ट अपना मान्यता देण्यात आली आहे, त्यानंतर कर्नाटक आणि दिल्लीचा क्रमांक लागतो.

स्टार्ट अपसाठी माहितीचे आदानप्रदान यासह इतर बाबींसाठी स्टार्ट अप इंडिया हब, स्टार्ट अपसाठी सार्वजनिक खरेदीकरीता निकषात शिथिलता, भांडवली लाभावरती करसवलत, अटल इनोव्हेशन मिशन, जैवतंत्रज्ञान क्षेत्रातल्या स्टार्ट अपसाठी प्रोत्साहन, स्टार्ट अपसाठी तीन वर्षांकरिता कर सवलत, स्टार्ट अपसाठी पत हमी निधी, सात नव्या संशोधन पार्कची उभारणी ही ‘स्टार्ट अप इंडिया कृती आराखड्याची’ महत्वाची वैशिष्ट्ये आहेत.

पर्यायी गुंतवणूक निधीने 247 स्टार्ट अपमधे 1625.23 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane(Release ID: 1576211) Visitor Counter : 136


Read this release in: English