पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

आंध्र प्रदेशातल्या पोलावरम बहुउद्देशीय प्रकल्पाशी संबंधित बांधकामासाठी सरकारकडून दोन वर्षांची मुदतवाढ

Posted On: 26 JUN 2019 6:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जून 2019

 

आंध्र प्रदेशातल्या पोलावरम बहुउद्देशीय प्रकल्पाशी संबंधित बांधकामासाठी दोन वर्षांच्या मुदतवाढीची परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत याबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली.

आंध्र प्रदेशातल्या नागरिकांसाठी हा प्रकलप अत्यंत महत्त्वाचा आहे, असे जावडेकर यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे जवळपास 3 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. वर्ष 2011 मध्ये तेव्हाच्या सरकारने आंध्र प्रदेश सरकारला प्रकल्पाचे बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, वर्ष 2014 मध्ये रालोआ सरकारने पोलावरम प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर केला. त्यानंतर सहा वेळा प्रकल्पाचे काम थांबवण्याविषयीचे आदेश बाजूला ठेवण्यात आले आहेत.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane



(Release ID: 1575866) Visitor Counter : 87


Read this release in: English