पंतप्रधान कार्यालय

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मायकेल पॉम्पिओ यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 26 JUN 2019 3:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जून 2019

 

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मायकेल आर. पॉम्पिओ यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

परराष्ट्र व्यवहार मंत्री पॉम्पिओ यांनी पंतप्रधानांचे निवडणुकीतल्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी  परराष्ट्र व्यवहार मंत्री पॉम्पिओ यांचे आभार मानले आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांच्याप्रती आभार पोहोचवण्याची विनंती केली.

अमेरिकेसोबतच्या संबंधांना असलेल्या प्राधान्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आणि सरकारच्या नव्या कार्यकाळात धोरणात्मक भागीदारीबाबत दृष्टिकोन मांडला.

भारतासोबतचे संबंध वृद्धिंगत करण्याचे आणि समान दृष्टिकोन व उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी एकत्रितपणे काम करणे अमेरिका सुरुच ठेवेल, असे पॉम्पिओ यांनी सांगितले.

व्यापार आणि अर्थव्यवस्था, ऊर्जा, संरक्षण, दहशतवादाला प्रतिबंध आणि नागरिकांमधील संबंध या क्षेत्रात द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 



(Release ID: 1575765) Visitor Counter : 174


Read this release in: English