मंत्रिमंडळ

आग्रा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता


8,379.62 कोटी रुपयांचा प्रकल्प 5 वर्षात पूर्ण होणार

प्रविष्टि तिथि: 28 FEB 2019 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019

 

दोन कॉरीडॉरच्या आग्रा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाने  मान्यता दिली आहे.हे दोन कॉरीडॉर आग्रा शहराच्या महत्वाच्या  सार्वजनिक सुविधा सेवा आणि शहराचा महत्वाचा समूह असलेला भाग,पर्यटन स्थळाना  जोडणार आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी होऊन वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे त्याचबरोबर प्रवासाचा वेळ आणि खर्चही कमी होणार आहे.

वैशिष्ट्ये

आग्रा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला दोन कॉरीडॉर राहणार असून ताज महाल,आग्रा किल्ला,राजा की मंडी रेल्वे स्थानक आणि घनदाट लोकवस्तीचे  भाग याद्वारे जोडले जाणार आहेत.  हा मार्ग काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भूमिगत राहणार आहे.

हा प्रकल्प 5 वर्षात पूर्ण होणार असून त्यासाठी 8379.62 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे वाणिज्यिक वेळामध्ये सुमारे 20 लाख लोकांना याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ होणार आहे.

 

प्रकल्प तपशील

आग्रा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार काही भाग  समान  समभाग  तर काही भाग बहुविध आंतरराष्ट्रीय वित्तीय निधीकडून सॉफ्ट लोन म्हणून  उपलब्ध करून वित्तीय पाठबळ  देण्यात येणार आहे. 2019-20 या  वित्तीय वर्षासाठी  उत्तर प्रदेश सरकारने आधीच 175 कोटीची तरतूद केली आहे.

 

प्रभाव

या प्रकल्पामुळे शहराला माफक दरात, विश्वासार्ह,सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे त्यातून अपघातांचे प्रमाण कमी होण्या बरोबरच प्रदूषण, प्रवासाचा वेळ,उर्जा वापर कमी होणार आहे.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D. Rane

 

 


(रिलीज़ आईडी: 1575732) आगंतुक पटल : 113
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English