आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
ई-फार्मसीद्वारे औषधांची विक्री
Posted On:
25 JUN 2019 6:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2019
जीएसआर 817 (ई) 28 ऑगस्ट 2018 द्वारे, सरकारने औषध आणि सौंदर्यप्रसाधने नियम 1945 मध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना मागवण्याकरीता मसुदा नियम प्रसिद्ध केले. ई-फार्मसीद्वारे औषध विक्री आणि वितरणाच्या नियमनासंदर्भात, मोठ्या संख्येने सूचना प्राप्त झाल्या असून, त्यांचे परीक्षण सुरु आहे. त्याचप्रमाणे देशातल्या विविध न्यायालयात प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यामुळे नियम अंतिम करण्यासंदर्भात वेळेची मर्यादा सांगता येणार नाही. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(Release ID: 1575632)
Visitor Counter : 93