पंतप्रधान कार्यालय

अवकाळी पाऊस आणि वादळामुळे देशाच्या विविध भागात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख

प्रविष्टि तिथि: 17 APR 2019 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2019

 

मध्यप्रदेश, राजस्थान, मणीपूर सह देशाच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि वादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

या पावसाचा फटका बसलेल्या बाधितांच्या मदतीसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, परिस्थितीवर सरकारचे लक्ष आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, मणिपूरसह देशाच्या विविध भागात वादळ आणि अवकाळी पावसात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकाला, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची, तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात येईल.

 

 

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 


(रिलीज़ आईडी: 1575571) आगंतुक पटल : 59
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English