माहिती आणि प्रसारण मंत्रालय

प्रकाशन विभाग लवकरच ‘गीत रामायणा’ची हिंदी आवृत्ती प्रसिद्ध करणार

Posted On: 24 JUN 2019 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जून 2019

 

‘गीत रामायणा’ची दत्त प्रसाद जोगकृत हिंदी पुस्तक आवृत्ती प्रकाशन विभाग लवकरच प्रसिद्ध करणार आहे. आज झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा निर्णय घेतला. यासंदर्भात आयुष मंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांना यासंदर्भात जावडेकर यांनी पत्र लिहून कळवले आहे.

गीत रामायण:-

ग.दि.माडगूळकर लिखित आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणाने इतिहास घडवला होता. 1955-56 या वर्षात पुणे आकाशवाणी वरुन गीतरामायणाचे प्रसारण करण्यात आले होते.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane


(Release ID: 1575470)
Read this release in: English