सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांच्या संख्येत वाढ करण्यासाठी धोरण निश्चिती

Posted On: 24 JUN 2019 4:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जून 2019

 

लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांच्या संख्येत देशात शाश्वत वाढ व्हावी, यासाठी लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योग मंत्रालयाने ठोस योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे, यासाठी मंत्रालय कर्जाची सोय, तंत्रज्ञान विकास आणि कौशल्य विकासाला प्राधान्य देणार असून, यामुळे या उद्योगाला चालना मिळेल.  याअंतर्गत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, यामध्ये 12074 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येईल, तर पीएमइजीपीला 2247.10 कोटी रुपये आवंटीत करण्यात आले आहे.

स्फुर्ती अर्थात पारंपरिक उद्योगांच्या पुर्ननिर्मितीसाठी निधी योजना. यामध्ये वर्ष 2018-19 दरम्यान 143.15 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य पारंपरिक कलाकारांना देण्यात येईल.

नुतनीकरण, ग्रामीण उद्योग आणि उद्यमशिलता संवर्धन योजना तसेच भागभांडवल अनुदान योजना, सुक्ष्म आणि लघु उद्योग विकास कार्यक्रमांचाही यात समावेश आहे.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane


(Release ID: 1575419) अभ्यागत कक्ष : 153
Read this releasein: English