पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 7 कोटी 23 लाख जोडण्या


उत्तरप्रदेशला सर्वाधिक 1,30,81,084, तर महाराष्ट्रात 40,86,878

Posted On: 24 JUN 2019 4:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जून 2019

 

एलपीजी जोडणी नसलेल्या गरीब कुटुंबांसाठी प्रधानमंत्री उज्जवला योजना असून, कुटुंबातल्या प्रौढ महिलेच्या नावाने एलपीजी जोडणी दिली जाते.  योजनेसाठी www.pmujjwalayojana.com हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच योजनेची चौकशी, तक्रारी आणि सूचनांसाठी 18002666696 हा टोल फ्री नंबर आहे. पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. योजनेंतर्गत महाराष्ट्रात 19 जून 2019 पर्यंत 40,86,878 जोडण्या देण्यात आल्या आहेत. सर्वाधिक जोडण्या उत्तरप्रदेश 1,30,81,084, बिहार 79,29,510, तर मध्य प्रदेश 64,70,761 जोडण्या देण्यात आल्या.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane



(Release ID: 1575411) Visitor Counter : 167


Read this release in: English