वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
किंबर्ले प्रक्रियेसाठीची आंतरसत्रीय बैठक 2019 मुंबईत सुरु
किंबर्ले प्रक्रियेची उत्क्रांती आणि परिवर्तनात भारत सक्रीय भूमिका बजावेल: डीजीएफटीचे महासंचालक
Posted On:
17 JUN 2019 7:36PM by PIB Mumbai
हिऱ्याच्या बाजारात एक हिरा जरी समस्या निर्माण करणारा असेल तरीही, तो ह्या बाजारासाठी त्रासदायक ठरु शकतो, त्यामुळे समस्याग्रस्त हिरेव्यापाराला समस्यामुक्त करण्यासाठी, किम्बर्ले प्रक्रीयेची उत्क्रांती आणि परिवर्तनात भारत सक्रीय भूमिका बजावेल,अशी माहिती, परदेशी व्यापार महासंचालनालयाचे मह्संचालक आलोक वर्धन चतुर्वेदी यांनी दिली.किंबरले प्रक्रियेसाठीची आंतरसत्रीय बैठक 2019 आज मुंबईत सुरु झाली, त्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हिरे व्यापार क्षेत्रात महत्वाचे असलेले चार ‘सी’-म्हणजे कट, क्लॅरीटी, कलर आणि कैरेट याशिवाय आता आणखी एक सी- ‘कॉन्फ्लिक्ट फ्री’ चा जोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिरेव्यापारात पी या इंग्रजी अक्षरावरून सुरु होणारे पाच शब्द महत्वाचे असतात, ते म्हणजे- प्रेशियस, पॉप्युलर, प्रेस्टीज, प्राईजलेस आता यात ‘पीस’ डायमंडचा समावेश होईल,असेही त्यांनी सांगितले.
किंबर्ले प्रक्रिया प्रमाणपत्र योजना आंतरसत्रिय बैठक 2019 ही वार्षिक परिषद असून ती प्रशासक, समाज आणि हिरेव्यापाऱ्यांमध्ये समन्वय साधण्याच्या हेतूने भरवलीजाते. हिरेव्यापाऱ्यात येणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी ह्या परिषदेत काम केले जाते, यंदा ह्या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे असून,मुंबईत 17 ते 21 जून 2019 दरम्यान ही परिषद होणारआहे.
ह्या परिषदेत, 82 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. जागतिक हिरे परिषदेचे अध्यक्ष स्टीफन फिशलर आणि केपी सिव्हील सोसायटीचे समन्वयकश मिसोमित्सी यानीही ह्या उदघाटन समारंभात आपले विचार मांडले. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योगमंत्रालयानेही परिषद आयोजित केली आहे.
D.Wankhede/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1574856)
Visitor Counter : 98