माहिती आणि प्रसारण मंत्रालय
हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधल्या दूरचित्रवाणी मालिकांचे कलाकार, आभार, शीर्षक दाखवण्याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सूचना
Posted On:
14 JUN 2019 6:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2019
अनेक हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधल्या दूरचित्रवाणी वाहिन्या, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधल्या मालिकांच्या कलाकारांची नामावली, आभार, शीर्षक केवळ इंग्रजीतून दाखवतात असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निदर्शनाला आले आहे. यामुळे केवळ हिंदी आणि प्रादेशिक भाषा जाणणारे लोक दूरचित्रवाणी मालिका/कार्यक्रम यांच्या कलाकारांविषयी महत्वाच्या माहितीपासून वंचित राहतात.
देशातल्या दूरचित्रवाणी प्रेक्षकांना लाभ मिळावा या उद्देशाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व खाजगी उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्यांना, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधल्या दूरचित्रवाणी मालिकांच्या कलाकारांची नामावली, आभार आणि शीर्षक संबंधित भाषेतूनही दाखवण्याबाबत विचार करावा अशी सूचना केली आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1574631)
Visitor Counter : 92