मंत्रिमंडळ

सायबर सुरक्षा क्षेत्रात भारत आणि फिनलॅण्‍डदरम्यान सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 12 JUN 2019 9:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 जून 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला भारत आणि फिनलॅण्डदरम्यान सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्यावरील सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले.

भारत आणि फिनलॅण्डदरम्यान माहितीची देवाणघेवाण तसेच सुरक्षेशी संबंधित घटनांचा शोध आणि प्रतिबंध यासाठी सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या कराराचा उद्देश आहे.

जानेवारी 2019 मध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1574330) Visitor Counter : 85


Read this release in: English