संरक्षण मंत्रालय

वायु चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश

Posted On: 12 JUN 2019 1:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2019

 

पश्चिम नौदल कमांडच्या मुख्यालयाने वायु चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जलद प्रतिसादासाठी पुढील तयारी सुरु केली आहे.

  • राज्य प्रशासन, स्थानिक जिल्हा प्रशासन आणि भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून सावध करणाऱ्या सूचना देण्याचे तसेच खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश द्यायला सांगितले आहे.
  • नौदलाच्या जहाजांवर मानवी सहायता आणि आपत्ती मदत सामुग्री तैनात आहे.
  • समुद्रात कार्यरत असलेली भारतीय नौदलाची जहाजे आणि विमाने/हेलिकॉप्टर्सना समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या नौकांना किनाऱ्यावर परतण्याची सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • स्थानिक प्रशासनाला सहाय्य करण्यासाठी भारतीय नौदलाची बचाव पथके आणि मदत सामुग्री तयार ठेवणे.
  • आपतकालीन वैद्यकीय मदतीसाठी मुंबई स्थित अश्विनी या भारतीय नौदलाच्या रुग्णालयातल्या वैद्यकीय पथक आणि सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
  • पी8आय आणि आयएल विमाने शोध आणि बचाव मोहिमेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
  • मुख्यालय, किनाऱ्यावरील संरक्षण आणि सल्लागार गटाने वायू चक्रीवादळबाबत किनारपट्टी प्रदेशांना सूचना जारी केल्या आहेत.

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane



(Release ID: 1573983) Visitor Counter : 139


Read this release in: English