जलशक्ती मंत्रालय
जल शक्ती मंत्रालयाची सर्व राज्यांसह जलसंवर्धन , ग्रामीण पेयजल पुरवठा आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यावरील आढावा बैठक संपन्न
Posted On:
11 JUN 2019 12:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2019
केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज सर्व राज्यांचे जल संवर्धन , पेयजल व स्वच्छता मंत्री आणि मुख्य सचिव,यांच्याबरोबर नवी दिल्ली येथे एक आढावा बैठक घेतली. देशभरातील पेयजल आणि स्वच्छता क्षेत्रासाठी केलेल्या उपाययोजना आणि कृती आराखड्यांचा विशेषतः आगामी मान्सून महिन्यांत पावसाचे पाणी साठविण्याच्या तयारीचा आढावा घेण्यावर या बैठकीचा भर होता. 24 राज्यांचे जल आणि स्वच्छता मंत्री त्यांच्या संबंधित राज्यांच्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या बैठकीत सहभागी झाले होते.
जल संवर्धन आणि ग्रामीण पेयजल
आगामी मान्सून हंगामात पाण्याचे संवर्धन करण्यासाठी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसह देशातील सध्याच्या पाण्याच्या स्थितीबाबत राज्य सरकारांनी घेतलेल्या पुढाकाराचा आढावा जलशक्ती मंत्र्यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्यांनी सहकारी संघराज्याच्या भावनेने कार्य केले पाहिजे अशी विनंती त्यांनी केली.ते म्हणाले की नव्याने तयार करण्यात आलेल्या जल शक्ती मंत्रालय पाणी पुरवठा आणि मागणीचे व्यवस्थापन एका छताखाली करेल. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणे पाण्याचा वापर आणि त्याचा पुनर्वापर हे जन आंदोलन बनावे यावर त्यांनी भर दिला. त्यांनी राज्यांना अन्य कार्यक्रमांबरोबर जल संवर्धन आणि जल साठवणूक करण्याची योजना आखण्याचे आवाहन केले. या संदर्भात त्यांनी देशाच्या सर्व सरपंचांना नुकतेच पंतप्रधानांनी लिहिलेल्या पत्राचा संदर्भ दिला आणि त्यांना जल संवर्धन कार्यक्रम हाती घेण्याचे आवाहन केले. पाणी साठविण्याच्या गरजेबाबत जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. (पेयजल आणि स्वच्छता), सचिव परमेश्वरन अय्यर यांनी सांगितले की, पहिल्यांदाच केंद्रीय पातळीवर पाण्याबाबत एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारला जात आहे. त्यांनी नमूद केले की, नव्या मंत्र्यांनी इतक्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य जल मंत्र्यांबरोबर एक बैठक बोलावल्याबद्दल उपस्थित मंत्र्यांनी प्रशंसा केली.
सिंह म्हणाले की, ग्रामीण कुटुंबांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी नवीन पाणीपुरवठा कार्यक्रमावर मंत्रालय काम करत आहे आणि असे कार्यक्रम तेव्हाच यशस्वी होऊ शकतात जेव्हा लहान सिंचन टाक्यांचा वापर न करणे, यासारखे विविध जलसंवर्धन प्रयत्न, केले जातात.
बैठकीला उपस्थित सर्व राज्य मंत्र्यांनी आपापल्या राज्यातील स्वच्छता, जलसंवर्धन, पेयजल पुरवठा आणि उघड्यावर शौचापासुन मुक्तीसाठी केलेल्या उपाययोजनातील प्रगतीची तसेच भविष्यातील योजनांची माहिती दिली.
B.Gokhale/S.Kane/D.Rane
(Release ID: 1573979)
Visitor Counter : 238