संरक्षण मंत्रालय
बेपत्ता एएन-32 विमानाचे अवशेष सापडले
Posted On:
11 JUN 2019 4:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2019
भारतीय हवाई दलाचे एएन-32 हे विमान आसाममधल्या हवाई दलाच्या तळावरुन 3 जून 2019 रोजी बेपत्ता झाले होते. या परिसरात शोध घेणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या एमआय-17 हेलिकॉप्टरला लिपोच्या उत्तरेकडे 16 किमी अंतरावर अंदाजे 12,000 फूट उंचीवर या विमानाचे अवशेष आढळले.
या विमानातल्या प्रवाशांचा ठावठिकाणा जाणून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1573910)
अभ्यागत कक्ष : 133