पंतप्रधान कार्यालय

सिक्किम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरात इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल केंद्राचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 07 MAR 2019 9:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मार्च 2019

 

ईशान्य भागात स्मार्ट गव्हर्नंसची  नवी सुरवात होत असून आपण त्याचा एक भाग असल्याबद्दल मला आनंद आहे. इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल केंद्राचे अर्थात एकात्मिक आज्ञा आणि नियंत्रण केंद्राचे,गंगटोक,नामची,पासीघाट,इटानगर आणि आगरतळा इथे सुरवात म्हणजे एक स्तुत्य पाऊल आहे.

कुशल मनुष्य बळ एकत्रित असलेल्या,ईशान्येकडच्या  नागरी केंद्रांमध्ये, या संपूर्ण भागाच्या विकासाचे इंजिन म्हणून उदयाला येण्याची क्षमता आहे.

स्मार्ट सिटी अभियानामुळे,आपली क्षमता आणि आव्हाने ओळखण्यासाठी ही शहरे सक्षम झाली आहेत. जनतेशी संवादातून या आव्हानांवर स्मार्ट तोडगा ते प्रदान करतात. एकात्मिक आज्ञा आणि नियंत्रण केंद्र,विविध सेवा नेटवर्क एकीकृत करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असतो. या केंद्रामुळे,पोलीस,वाहतूक,उर्जा,पाणी,स्वच्छता आणि सार्वजनिक सेवा यांच्यात सहयोग सुनिश्चित करता येतो.

            ही यंत्रणा सुरु झाल्यानंतर,प्रशासकांना,शहराची उत्तम देखभाल करून त्याला योग्य वेळेत प्रतिसादही देणे शक्य होईल याचा मला विश्वास आहे.

एकात्मिक आज्ञा आणि नियंत्रण केंद्राची अंमलबजावणी देशात जलदगतीने होत आहे.2019 या वर्षाच्या मार्चच्या पहिल्या तारखेपर्यंत, 15 स्मार्ट सिटीमध्ये ही केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. 15  इतर केंद्रांचे कामही प्रगतीपथावर आहे.

ईशान्य भागाचे हे  एकात्मिक आज्ञा आणि नियंत्रण केंद्र,ऑक्टोबर 2019 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मला देण्यात आली आहे.

या यंत्रणेचा एक महत्वाचा घटक म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही यंत्रणा आहे.

वाहतूक व्यवस्थापन पद्धतीमुळे वाहतुकीची कोंडी न होता वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मदत होणार आहे.

नियंत्रण केंद्रातल्या घन कचरा व्यवस्थापन घटकांमुळे शहरातल्या स्वच्छतेला चालना मिळणार आहे.स्मार्ट पथ दिव्यांमुळे रस्ते अधिक सुरक्षित आणि नागरिक स्नेही होणार आहेत.एलईडी यंत्रणाद्वारे उर्जा सुरक्षितताही वाढणार आहे.

महत्वाची नागरी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनिक यंत्रणा वापरही स्मार्ट सिटी मधे करण्यात येत आहे.

डिजिटल एक्सेस हा डिजिटल इंडिया अभियानाचा महत्वाचा घटक आहे.सार्वजनिक वाय-फाय यंत्रणेमुळे नागरिकांना मोफत इंटरनेट मिळू शकेल.

ईशान्य भाग हा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील भाग आहे. पर्यावरण देखरेख यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन भाग नागरिकांना आणि सरकारला वास्तविक माहिती देईल. यामुळे जनतेच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी मदत होईल.

या यंत्रणेच्या विविध घटकांची अंमलबजावणी आणि विस्ताराला शहरांनी सुरवात केल्यानंतर नागरिकांचे जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल.

ईशान्येतल्या 10 स्मार्ट सिटीमधे 15000 कोटी रुपयांचे 500 प्रकल्प आहेत अशी माहिती मला देण्यात आली आहे. 59 प्रकल्पांसाठी कार्यादेश आधीच काढण्यात आला आहे.

सिक्कीमच्या नामचीन इथे एकात्मिक पाणी पुरवठा प्रकल्पाचे,एलईडी पथ दिव्याचे आणि फुटपाथचे काम सुरु झाले आहे हे पाहून मला आनंद झाला आहे. डोंगराळ भागातल्या शहरात पाणी हे मोठे आव्हान ठरत आहे.गंगटोक मधे रेन वाटर हार्वेस्टिंगचे काम सुरु झाले आहे.वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी स्मार्ट पार्किंग वैशिष्ट्यासह बहु स्तरीय पार्किंग प्रकल्प बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

बशीच्या आकाराच्या भौगोलिक रचनेमुळे आगरतळाला वेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि या रचनेमुळे इथे पुराचा धोकाही जास्त राहतो. याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

स्मार्ट रस्ते आणि कुशल वाहतूक आणि परिवहन व्यवस्थापन पद्धतीद्वारे शहर रस्ते जाळे सुधारण्याचा इटानगरचा आराखडा आहे. पासीघाट इथे गृहनिर्माण,उर्जा व्यवस्थापन आणि व्यापार विकास या मुद्द्यांची स्मार्ट  सिटी प्रकल्पाद्वारे दखल घेण्यात येत आहे.

प्रत्येक शहराचे महत्वाचे प्रश्न ओळखून त्यावर उपाय शोधून त्या दिशेने काम सुरु आहे.

गुवाहाटी,ऐझवाल,कोहिमा,इंफाळ आणि शिलॉंग या ईशान्येतल्या आणखी पाच शहरातही या दिशेने काम सुरु आहे याचा मला आनंद आहे.

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला आता गती आली आहे.

ईशान्येकडची शहरे झपाट्याने नागरी कायापालटाच्या दिशेने जोमदार प्रगती करत आहेत याचा मला विश्वास आहे.यामुळे जनतेचे जीवनमान उंचावण्याबरोबरच या भागाच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1573866) Visitor Counter : 46


Read this release in: English