पंतप्रधान कार्यालय

जसपूर येथे 4 मार्च, 2019 रोजी विश्व उमियाधाम मंदिर संकुलाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 04 MAR 2019 10:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 मार्च 2019

 

बोल मेरी माँ जय-जय उमिया

बोल मेरी माँ जय-जय उमिया

बोल मेरी माँ जय-जय उमिया

आज शिवरात्रि आहे.

हर-हर महादेव.

मोठ्या संख्येने उपस्थित माता उमियाचे भक्तगण,

आज आपण उमिया धाम इथे आलो आहोत, जी शक्तीच्या उपासनेला समर्पित आहे, तर तीन जयजयकार आधी म्हणूया. आणि त्यानंतर मी माझे भाषण सुरु करतो. भारत माता की जयचे तीन जयजयकार म्हणायचे आहेत.

पराक्रमी भारतासाठी , भारत माता की जय

विजयी भारतासाठी, भारत माता की जय

वीर जवानांसाठी , भारत माता की जय

मी सर्वप्रथम सर्व विश्वस्तांचे आभार व्यक्त करतो, त्यांचे अभिनंदन करतो, त्यांनी अतिशय महत्वाच्या कामाची जबाबदारी उचलली आहे. आपल्या देशात एक वर्ग असा आहे, ज्याचे मत आहे की या सर्व धार्मिक प्रवृत्ति अनावश्यक आहेत. एक असा वर्ग आहे, ज्याला असे वाटते की या सर्व  प्रवृत्ति समाजाचे कल्याण करणाऱ्या नाहीत, काही निवडक लोकांचे भले करणाऱ्या आहेत, त्यांच्या अज्ञानावर दया येते.

हजारो वर्षे जुना आपला  इतिहास आहे, हा देश ऋषि- मुनि, आचार्य, संत, भगवंतगुरुजन, शिक्षक, वैज्ञानिक, शेतकरी या सर्वांच्या योगदानातून बनला आहे. आणि या सर्वांच्या शक्तीमुळेच आपल्या देशात आपली आध्यात्मिक परंपरा कायम आहे. आध्यात्मिक वारसा आहे. गुलामीच्या काळातही एवढी मोठी लढाई हजार बाराशे वर्षे आपण लढत आहोत, भारताच्या कानाकोपऱ्यात दरवेळी देशाची अस्मिता, देशाची संस्कृति, देशाची परंपरा यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्यांची रांग लागली आहे. कुठली प्रेरणा असेल, या देशाची आध्यात्मिक चेतना, या देशाचा आध्यात्मिक वारसा , समाज जीवनाला संचालित करण्याचे काम देखील आपल्या  आध्यात्मिक व्यवस्थेमुळे झाले आहे.

एक प्रकारे आपली आध्यात्मिक व्यवस्था आणि परंपरा सामाजिक चेतनेच्या केंद्रस्थानी राहिली आहे आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक जीवनात काळानुरूप  परिवर्तन देखील आले आहे. काळाच्या ओघात काही गोष्टी विस्मृतीत जातात, अनेकदा केवळ रीतिरिवाज राहतात. त्याचा आत्मा संपलेला असतो मात्र तरीही त्याच्या मुळाशी गेले तर अशी चेतना प्रकट होताना पाहायला मिळते. अनेक लोकांना वाटायचे की कुंभमेळा, तीन वर्षानंतर छोटा कुंभ आणि बारा वर्षानंतर मोठा कुंभ. वास्तविक दर तीन वर्षांनी भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले संत, विद्वान एकत्र बसून समाजाची चिंता करायचे आणि वेळापत्रक तयार करून त्यात काय-काय काम झाले त्याचा हिशेब मांडायचे आणि बारा वर्षांनी जेव्हा मोठा कुंभ व्हायचा तेव्हा त्या बारा वर्षात समाजात कोणते बदल आवश्यक आहेत, किती अशा जुन्या गोष्टी सोडून देण्यासारख्या आहेत , नव्या कोणत्या गोष्टी स्वीकार करण्यासारख्या आहेत आणि आगामी बारा वर्षांसाठी कुठल्या दिशेने जायचे आहे, त्याचे दिशा निर्देश या कुंभमेळ्यातील  चिंतन मंथनातून ठरायचे.

आपल्याकडे आध्यात्मिक चेतनेची व्यवस्था चालत आली आहे. यावेळी  प्रयागराज येथे जो कुंभमेळा झाला, जगातील प्रसिद्ध वृत्तपत्रांनी, यापूर्वी जेव्हा  कुंभमेळा व्हायचा, नागा बाबाचे वर्णन करण्यातच ते समाधान मानायचे, अखाड़ाची चर्चा करण्यातच वेळ जायचा, यावेळी कुंभमेळ्याची चर्चा जगभरातील वृत्तपत्रांमध्ये झाली आणि स्वच्छतेच्या बाबतीत झाली. कुंभमेळयातील स्वच्छता जिने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले, ही प्रेरणा आध्यात्मिक चेतनेतून प्रकट होते.

शंभर वर्षांपूर्वी महात्मा गागांधी हरिद्वार कुंभमध्ये गेले होते आणि तिथे गेल्यानंतर  त्यांनी एक भावना व्यक्त केली होती की आपला कुंभमेळा स्वच्छ का असू शकत नाही? शंभर वर्षानंतर हे काम पूर्ण करण्याचे सौभाग्य आपल्याला लाभले आहे. सांगायचे तात्पर्य हे की आपल्याकडे आध्यात्मिक शक्ति राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी , आध्यात्मिक शक्तीचा अनादर, आध्यात्मिक शक्तिची उपेक्षा, आध्यात्मिक चेतना संदर्भात थंड पवित्रा या कारणांमुळे या देशातील कोट्यवधी लोकांची शक्ति आणि श्रद्धा स्वातंत्र्यानंतर राष्ट्र निर्माणाच्या कार्यात लागायला हवी होती, ती दुर्दैवाने लागली नाही. मात्र सुदैवाने आज समाजात आध्यात्मिक व्यवस्थे अंतर्गत समाज सुधारक पुन्हा एकदा पुढे येत आहेत आणि भारताच्या कुठल्याही भागात जा, स्वातंत्र्य चळवळ देखील ... स्वातंत्र्य चळवळ जर कुणी पाहिली, तर त्याची पार्श्वभूमी भक्तियुगात दडलेली आहे. या देशाच्या भक्तियुगात, या देशाच्या संत-महंत, स्वामी विवेकानंद असतील, चैतन्य महाप्रभु असेल, रमण महर्षि असतील, भारताच्या कानाकोपऱ्यात, समाजाच्या कानाकोपऱ्यात संत-महंतांनी याची चिंता केली आहे. आणि एक आध्यात्मिक चेतनेचे पीठ उभे राहिले ज्याने 1857 च्या क्रांतीला जन्म दिला होता.

पुन्हा एकदा या देशात आध्यात्मिक चेतना जागृत होताना पहायला मिळत आहे. मी या शक्तीला आध्यात्मिक शक्तिच्या रूपात पाहतो. कुठल्याही समुदायाच्या शक्तीच्या रूपात मी पाहत नाही. ही आध्यात्मिक चेतना आहे आणि आध्यात्मिक चेतना राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचा पाया बनण्याचे काम करत आहे. आणि म्हणूनच मी माता उमियाच्या चरणी  वंदन करायला आलो आहे.

आता देश वेगाने चालू शकणार नाही, तुटका-मोडका  चालू शकणार नाही, अर्धवट चालू शकणार नाही, छोटे -छोटे करून पूर्ण होऊ शकणार नाही, जे काही करायचे हाये ते मोठे करावे लागेल. करायला हवे कि नको? होत आहे कि नाही? जर अशी वृत्ती नसती तर सरदार पटेलांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा बनला नास्ता. जर मोठा बनवायचा आहे तर केवळ भारतात मोठा का बनवायचा, जगातील सर्वात उंच का नको? काही लोकांना वाईट वाटते.

भारतात  बुलेट ट्रेन का असू नये? जगातील श्रेष्ठ गोष्टी भारतात का नसाव्यात? आणि  वीर जवानानी  पराक्रम करायचा तर छोटा का करावा? मोठा करावा, पक्का करावा, आणि जिथे करायचा असेल तिथेच करावा. भारताचा स्वभाव बदलला आहे. भारतातील सामान्य माणसाचे मन बदलले आहे आणि त्यामुळे देश आज संकल्प देखील करू शकतो आणि  सिद्धि देखील प्राप्त करू शकतो.

माता उमियाच्या छत्रछायेखाली इथे आध्यात्मिक चेतनेद्वारे तर सर्वाना आशीर्वाद प्राप्त होणारच आहे मात्र समाजाला आध्यात्मिक श्रद्धा आहे, त्याच्या आधारे बदलणे  जरा सोपे जाते. कुणीतरी  कल्पना देखील केली होती की हे पूर्ण जग नाक पकडून बसेल आणि योगासने शिकण्याचा प्रयत्न करेल अशी कधी कुणी कल्पना केली होती? जगात कुठेही जा, आज योगाचा गाजावाजा आहे. हा योगदिन मोदींनी आणलेला नाही, हा तर ऋषि-मुनिचा वारसा आहे. मोदीनी हिंमतीसह जगाला सांगितले, हा मार्ग  आहे, मी तुम्हाला दाखवतो आणि जग चालू लागले.

आज जेव्हा माता उमियाच्या चरणी बसलो आहोत तेव्हा जर छगनबापा यांचे स्मरण केले नाही तर आपण छोटे दिसू. इथे जेवढे लोक बसले आहेत, त्यांचे स्मरण  केले नाही तर आपण छोटे दिसू. इथे जेवढे लोक बसले आहेत, जिथे कुठे बसले आहेत, त्यांच्या मुळाशी छगनबाप्पा यांची दीर्घ दृष्टि होती, हे स्वीकारावे लागेल. मुलींना शिकवण्याची जबाबदारी  उचलली होती आणि जेव्हा छगनबापा यांची शताब्दी साजरी करत होतो तेव्हा मी पुन्हा एकदा सांगितले होते की या महापुरुषाने काही इथे-तिथे नाही, त्यांना माहित होते की या समाजाला जर पुढे घेऊन जायचे असेल तर मार्ग कोणता आहे? आणि त्यांनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला होता आणि आज हा पाटीदार समाज कुठून कुठं पोहचला.

मात्र आता एक छगनबापा चालणार नाही, आता शेकडो छगनबापा हवे आहेत, जे समाजाला नवीन सामर्थ्य देतील, नवीन चेतना देतील आणि नवीन मार्गावर चालण्याची नवीन हिंमत देतील, माता उमियाच्या धाममध्ये अशी व्यवस्था विकसित होईल असा मला विश्वास वाटतो.

सी. के. सारख्या युवकांची टीम कामाला लागली आहे. सी. के. यांना मी तीस वर्षांपासून ओळखतो, तीसपेक्षा जास्त झाली असतील, नेहमी हसणारा, नेहमी धावपळ करणारा माणूस आणि पवित्र भावनेने काम करणारा व्यक्ति, मी त्यांना अगदी जवळून ओळखतो आणि म्हणूनच मला विश्वास आहे की ही टीम आपले  आर. पी. धावपळ करणारे व्यक्ती आणि या नवीन टीमने हे सगळे आपल्या हातात घेतले आहे. आणि जुन्या टीमने आशीर्वाद दिले आहेत म्हणूनच मला पूर्ण खात्री आहे कि वेळेपूर्वी हे काम होईल आणि कल्पना केली त्यापेक्षा चांगले होईल.

मात्र जर आपण सर्व पुढे गेलो आणि चुकीच्या मार्गावर गेलो तर पुढे जाणाऱ्यांना काय म्हणतील? काय म्हणतील? हे माता उमियाची पूजा करतील आणि मातेच्या गर्भातील मुलींना मारून टाकतील तर माता माफ करेल का? का गप्प झालात? नाही नाही, गप्प का झालात? हे पहा, मी तुमच्यामध्येच मोठा झालो आहे, म्हणूनच तुम्हाला सांगण्याचा मला अधिकार आहे. पंतप्रधान आहे म्हणून सांगत नाही, तुमच्यामध्येच मोठा झालो, आणि मी पूर्वी उंझाच्या लोकांवर खूप नाराज व्हायचो. मी  उंझाच्या लोकांना जेवढे ओरडलो असेल  तेवढे कुणालाही ओरडलो नाही. कारण? संपूर्ण गुजरातमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होती, ती ऊंझा तालुक्यात होती. जिथे  माता उमिया विराजमान आहे तिथे मुलींना मारले जायचे.

या माता उमियाचे आशीर्वाद घेऊन आज मी तुमच्याकडे काही मागू इच्छितो. मागू? द्याल? उमिया मातेच्या समक्ष द्यायचे आहे हे सर्वजण तुमच्याकडे पैसे घायला येतील. हे जे हजार कोटी म्हणत आहेत, ते पूर्ण तर करायला लागतील? मला एक पैसा नको, मला आणखी काही हवे आहे, द्याल? असे नाही, दोन्ही हात उंच करून म्हणा , सर्वाना मंजूर आहे. आज माता उमियाच्या चरणी बसलो आहोत, दोन्ही हात वर करून मातेच्या चरणी बसलो आहोत , दोन्ही हात वर करून माता उमियाना नमस्कार करा आणि बोला, आता आपल्या समाजात जरा मोठ्याने म्हणा, "आता आमच्या समाजात चुकूनही मुलींना मारण्याचे पाप करणार नाही.भ्रूणहत्येचे पाप करणार नाही.  आपल्या समाजात जन्मलेला डॉक्टरही  पैसे कमावण्यासाठी या चुकीच्या मार्गावर जाणार नाही.आणि आपण आपल्या शक्तीचा वापर करून अन्य समाजातील लोकांना देखील समजावू कि मुलगा आणि मुलगी एक-समान आहेत . तुम्ही आज पहा,खेळाचेच उदाहरण घ्यासर्वात जास्त सुवर्णपदके मुली जिंकून आणतात , दहावीचे निकाल पहा , सर्वात जास्त रिझल्ट मुलींचा लागतो. बारावीचा निकाल पहा,जास्तीत जास्त निकाल मुलीच घेऊन येतात आणि काही लोकांना भ्रम आहे की मुलगा झाला तर म्हातारपण चांगले जाईल.  या भ्रमातून बाहेर याचार बंगले असतील, चार मुले असतील  आणि बाप वृद्धश्रमात पडलेला असतो.आणि एकुलती एक मुलगी असेल,आई वडील म्हातारे झाले असतील. तर मुलगी असा निर्णय घेते की मला लग्न करायचे नाही, मी माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करेन. आणि या समाजाकडे आज मी अधिकाराने मागायला आलो आहे आणि मला खात्री आहे की हा माझे म्हणणे ऐकणारा समाज आहे.

माता उमियाचा आशीर्वाद घेऊन समाजात क्रांती आणायची आणि दुसरी मला चिंता भेडसावते आहे , ही चिंता वाटत आहे म्हणून मी काही आरोप करत नाही.दुर्दैवाने आपली जी नवीन पिढी येत आहे , त्यांच्यात काही गोष्टी घर करून गेल्या आहेत, किंवा घुसत आहेत, त्या आपल्या भावी पिढीला उध्वस्त करतील. आपल्या तरुण पिढीला आपण वाचवायला हवे. व्यसन, नशा, अशा चुकीच्या मार्गावर आपल्या मुलानी जाऊ नये त्याची चिंता करायला हवी , पैसे तर येतील मात्र पैशाबरोबर अशा प्रकरच्या गोष्टी घरात घुसू नयेत ही जबाबदारी देखील माता उमियाच्या प्रत्येक सुपुत्राची आहे.

हे मी अशासाठी सांगतो आहे कारण मला माहित आहे कुटुंबांमध्ये मुलांना वाचवणे कठीण जात आहे , अशा वेळी अशी आध्यात्मिक चेतना लवकरात लवकर वाचवू शकते , हे सामूहिक संस्कार लवकर वाचवू शकतात. आणि म्हणूनच हे उमिया धाम समाज शिक्षाचे केंद्र बनेल, समाज संस्काराचे केंद्र बनेल, सामाजिक चेतनेचे केंद्र बनेल, ते सामाजिक क्रांतीचे केंद्र बनावे अशा अनेक शुभेच्छांसह सर्व विश्वस्तांना माझ्या खूप-खूप शुभेच्छा, आणि मी 2019 नंतर देखील भारत सरकारमध्येच असें, म्हणूनच चिंता करू नका.

भारत सरकारला यात काहीही करायचे असेल, तर दिल्लीत जे घर आहे ते तुमचेच आहे. खूप-खूप  धन्यवाद.

पुन्हा एकदा म्हणा-

बोल मेरी माँ जय जय उमिया

बोल मेरी माँ जय जय उमिया

बोल मेरी माँ जय जय उमिया

भारत माता की जय!

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar



(Release ID: 1573864) Visitor Counter : 91


Read this release in: English