कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री म्हणून डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी पदभार स्वीकारला

Posted On: 04 JUN 2019 5:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जून 2019

 

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री म्हणून डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी आज पदभार स्वीकारला. या मंत्रालयाचे राज्यमंत्री आर. के. सिंह तसेच या आधी या मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणारे मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते. युवकांना आपल्या देशात तसेच देशाबाहेरही यशस्वी ठरण्यासाठी मदत व्हावी या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाची रुपरेषा तयार केली आहे असे डॉ. पांडे म्हणाले. युवकांच्या कौशल्याला आणि प्रतिभेला वाव देण्यासाठी हे मंत्रालय अतिशय उपयुक्त असल्याचे ते म्हणाले. रोजगाराला आपण सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले.

डॉ. महेंद्रनाथ पांडे उत्तर प्रदेशमधल्या चंदौली मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. सुमारे तीन दशकं राजकारणात राहिलेल्या पांडे यांनी एम.ए ची पदवी, मास्टर ऑफ जर्नालिझम आणि पीएचडी प्राप्त केली आहे.  

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1573426) Visitor Counter : 70


Read this release in: English