रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री म्हणून जनरल व्ही. के. सिंह (निवृत्त) यांनी स्वीकारला पदभार

Posted On: 03 JUN 2019 6:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2019

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री म्हणून जनरल व्ही. के. सिंह (निवृत्त) यांनी आज पदभार स्वीकारला. या आधीच्या सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेले उत्तम कार्य आपण सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. देशातल्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधेच्या सर्वांगीण विकासाला आपले सर्वोच्च प्राधान्य राहील असे ते म्हणाले.

 

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 


(Release ID: 1573285) अभ्यागत कक्ष : 82
Read this releasein: English