पंतप्रधान कार्यालय

नेपाळच्या पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

प्रविष्टि तिथि: 31 MAY 2019 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मे 2019

 

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळ सदस्यांच्या शपथविधीला उपस्थित होते. 31 मे रोजी के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के. पी. शर्मा ओली यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले आणि नेपाळसमवेत असलेले पारंपारिक संबंध आणि बहुआयामी भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

द्विपक्षीय प्रकल्प आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत झालेल्या प्रगतीविषयी दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

 

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar

 

 


(रिलीज़ आईडी: 1573271) आगंतुक पटल : 83
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English