अर्थ मंत्रालय
निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
31 MAY 2019 5:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2019
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर, वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग आणि विभागातील वरिष्ठ सचिवांनी सीतारामन यांचे स्वागत केले. निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.
पदभार स्वीकारल्यानंतर अर्थ मंत्रालयाच्या विविध विभागांच्या सचिवांनी सीतारामन यांना धोरणात्मक मुद्दे आणि उपक्रमांची माहिती दिली. तसेच भारतीय अर्थ व्यवस्थेसमोर येऊ घातलेल्या आव्हानांचीही कल्पना दिली.
निर्मला सीतारामन यांनी आधीच्या सरकारमधे संरक्षण मंत्री म्हणून काम केले आहे. सीतारामन या कर्नाटकातून राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

D.Wankhade/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1572961)