संरक्षण मंत्रालय

नौदल प्रमुख ॲडमिरल सुनिल लांबा उद्या होणार सेवा निवृत्त

Posted On: 30 MAY 2019 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2019

 

देशाचे नौदल प्रमुख ॲडमिरल सुनिल लांबा यांचा कार्यकाळ उद्या पूर्ण होणार असून, 4 दशकांच्या सेवेनंतर ते उद्या सेवा निवृत्त होणार आहेत.

पुण्याजवळच्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेल्या ॲडमिरल लांबा यांनी संरक्षण क्षेत्रातली आपली उच्च पदवी लंडनच्या संरक्षण महाविद्यालयातून घेतली आहे. लांबा यांना प्रशिक्षण, प्रत्यक्ष कृती आणि तिन्ही सेवांमध्ये पदभरतीचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या हाताखाली भारतीय लष्करातले अनेक अधिकारी पारंगत झाले आहेत.

भारतीय नौदलात लांबा यांनी विविध पदांवर काम केले. 31 मे 2016 रोजी ते नौदल प्रमुख झाले. 1 जानेवारी 2017 रोजी चिफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्यकाळात भारताच्या युद्ध नौका आणि लढाऊ विमानांचेही अत्याधुनिकरण झाले. समुद्रातल्या दुर्गम भागातूनही संवाद साधू शकतील अशा युद्ध नौका त्यांच्या काळातच विकसित झाल्या. युद्ध सज्ज नौका आणि पाणबुड्या तयार करण्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याच कार्यकाळात नौदलाचे बहुस्तरीय उपक्रमही राबवण्यात आले. यात आयओएनएस’चा दहावा वर्धापन दिन यासह विविध देशांसोबत केलेला संयुक्त सराव आणि संयुक्त कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय नौदलाचा परदेशांसोबत संपर्क वाढला.

 

 

S.Tupe/R.Aghor/D.Rane


(Release ID: 1572844)
Read this release in: English