संरक्षण मंत्रालय

हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस.धनोआ यांच्याकडे चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे

Posted On: 29 MAY 2019 4:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मे 2019

 

हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांच्याकडे चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या (COSC) अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. देशाच्या संरक्षणमंत्र्यांना राजकीय आणि लष्करी कारवायांसंदर्भात सल्ला देण्याची जबाबदारी COSC च्या अध्यक्षांची असते. नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांच्याकडून ही अध्यक्षपदाची सूत्रे धनोआ यांना देण्यात आली. लांबा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 31 मे 2019 पासून ही जबाबदारी धनोआ सांभाळतील.  येत्या 31 मे रोजी लांबा निवृत्त होणार आहेत.

राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेले बी.एस.धनोआ जून 1978 साली भारतीय हवाई दलात दाखल झाले. ते तज्ञ आणि अनुभवी लढाऊ वैमानिक म्हणून ओळखले जात असून तीन हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी मिग-21 ही लढाऊ विमाने हाताळली. कारगिल युद्धाच्या दरम्यान त्यांनी कमांडिंग ऑफिसर म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती.

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 


(Release ID: 1572774)
Read this release in: English