संरक्षण मंत्रालय

डीआरडीओ कडून आकाश- एमके -1एस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

Posted On: 27 MAY 2019 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मे 2019

 

संरक्षण, संशोधन आणि विकास संघटना, डीआरडीओ ने 25 आणि 27 मे 2019 रोजी ओडिशातील चंडीपूर येथे असलेल्या अवकाश तळावरुन आकाश- एमके -1एस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. आकाश- एमके -1एस ही सध्या असलेल्या आकाश क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे देशी बनावटीचे आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्याचा अचूक भेद करु शकते. आकाश क्षेपणास्त्रावरील शस्त्रप्रणालीत कमांड संचालन आणि सक्रिय टर्मिनल संचालन अशी दोन्ही आयुधे आहेत.

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar



(Release ID: 1572719) Visitor Counter : 123


Read this release in: English