पंतप्रधान कार्यालय

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी पंतप्रधानांचे केले अभिनंदन

Posted On: 24 MAY 2019 2:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मे 2019

 

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन 17 व्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनतेची प्रगती आणि भरभराट होऊ दे, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

भूतानच्या राजांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. भूतानसोबत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि विशेष मैत्रीला भारत सरकार सर्वाधिक महत्व देत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांमधली भागीदारी नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी भारत सरकार काम करत राहील, या प्रतिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

 

 

M.Chopade/S.Kakade/D.Rane



(Release ID: 1572512) Visitor Counter : 57


Read this release in: English