संरक्षण मंत्रालय

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

Posted On: 22 MAY 2019 5:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2019

 

भारतीय हवाईदलाने आज एसयू-30 एमकेआय लढाऊ विमानाद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे वजन 2.5 टन असून, ते हवेतून 300 किलोमीटरवरील जमिनीवरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. ब्राह्मोस एअरोस्पेस प्राइवेट लिमिटेड (बीएपीएलने) ते विकसित केले आहे.

भारतीय हवाई दलाच्या अभियंत्यांनी यासाठी विमानाचे सॉफ्टवेअर विकसित केले असून, हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने यांत्रिक आणि विद्युत अद्ययावतीकरण केले आहे.

 

M.Chopade/S.Kakade/D.Rane


(Release ID: 1572390)
Read this release in: English