संरक्षण मंत्रालय

पाकिस्तानी मच्छिमार बोटीतून संशयास्पद अमली पदार्थाची 194 पाकिटे भारतीय तटरक्षक दलाकडून जप्त

Posted On: 21 MAY 2019 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मे 2019

 

भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी मच्छिमार बोटीतून संशयास्पद अमली पदार्थाची 194 पाकिटे जप्त केली आहेत. 19 मे रोजीच यासंदर्भात माहिती गुप्तचर सूत्रांकडून मिळताच भारतीय तटरक्षक दलाने कारवाई सुरु केली होती. भारतीय तटरक्षक दलाच्या अरिंजय गस्तनौकेद्वारे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सागरी सरहद्दीलगत संशयित बोटीचा शोध घेतला जाऊ लागला. तसेच जखाऊ आणि ओखा इथून सी-437 आणि सी-408 या नावाही शोधासाठी रवाना झाल्या.

20 आणि 21 मे रोजी तटरक्षक दलाच्या डॉर्निअर विमानाद्वारे हवाई पाहणी करण्यात आली. 20 मे च्या रात्री एका मच्छिमार बोटीवर संशयित हालचाली आढळून आल्या. 21 मे रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमाराला अल मदिना ही बोट जखाऊ बंदराकडे जात असतांना भारतीय सरहद्दीत अरिंजय गस्तनौकेने तिला अडवले. अल मदिना कराचीत नोंदणी झालेली पाकिस्तानी मच्छिमार बोट असून, तिच्यावर 6 पाकिस्तानी नागरिक होते. प्रारंभिक शोधात संशयित अमली पदार्थाची 194 पाकिटे सापडली. यासंदर्भात पुढील तपास सुरु आहे.

भारतीय तटरक्षक दलाने 24 मार्च 2019 रोजी गुजरात एटीएस सह केलेल्या संयुक्त कारवाईत पाकिस्तानी मच्छिमार बोटीतून 100 किलो हेरॉईन जप्त केले होते.

 

 

 

N.Sapre/S.Kakade/D.Rane

 


(Release ID: 1572336)
Read this release in: English