जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय

देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी घट

Posted On: 16 MAY 2019 6:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2019

 

देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 16 मे 2019 रोजी संपलेल्या आठवड्यात 35.99 अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते 22 टक्के इतके आहे.

या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता 161.993 अब्ज घनमीटर इतकी आहे. 91 पैकी 37 जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून, यामध्ये 27 धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता 31.26 अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या 4.10 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे.

हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तराखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक, आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला जलसाठा उपलब्ध आहे.

राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, ओदिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत कमी आहे.

M.Chopade/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1572131) Visitor Counter : 77


Read this release in: English