कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
लोकपालच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
Posted On:
16 MAY 2019 5:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2019
लोकपालचे अध्यक्ष पिनाकी चंद्र घोष यांनी आज लोकपालच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत लोकपालच्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले. यावेळी एनआयसीच्या महासंचालक नीता वर्मा उपस्थित होत्या. एनआयसीने हे संकेतस्थळ विकसित केले आहे. http://lokpal.gov.in. वर ते पाहता येईल.
लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 अंतर्गत लोकपालची स्थापना झाली असून स्वतंत्र भारतातील अशा प्रकारची ही पहिली संस्था आहे. या कायद्याच्या कार्यकक्षेत येणाऱ्या नागरी सेवकांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी चौकशी आणि तपास करण्यासाठी तिची स्थापना झाली आहे.
लोकपालचे पहिले अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती झाली असून 23 मार्च 2019 ला राष्ट्रपतींनी त्यांना शपथ दिली.
नियम अधिसूचित करण्याबाबत तसेच तक्रार स्वीकारण्याच्या पद्धतीबाबत नियमावली विकसित करण्याबाबत काम सुरु आहे. 16 एप्रिल 2019 पर्यंत प्राप्त सर्व तक्रारी लोकपाल कार्यालयाने तपासल्या असून त्या निकाली काढण्यात आल्या आहेत.
M.Chopade/S.Kakade/P.Malandkar
(Release ID: 1572116)