जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय

गंगा खोऱ्यात रुद्राक्ष रोपांची लागवड करण्यासंदर्भातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 15 MAY 2019 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मे 2019

 

नॅशनल मिशन फॉर क्लिन गंगा हे गंगा स्वच्छता अभियान, एचसीएल फाउंडेशन आणि आयएनटीएसीएच यांच्यात उत्तराखंडमध्ये रुद्राक्ष रोपांच्या लागवडीचा प्रकल्प हाती घेण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. नमामी गंगे कार्यक्रमाअंतर्गत सामाजिक उत्तरदायित्व म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये गंगानदीच्या खोऱ्यात 10,000 रुद्राक्ष रोपांची लागवड करण्याचे उदिृष्ट या प्रकल्पाअंतर्गत ठेवण्यात आले आहे.

यासाठी स्थानिक समुदाय आणि इतर संबंधितांचे सहकार्यही घेण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे या भागातल्या जनतेसाठी उत्पन्नाचा एक स्रोतही निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1572052)
Read this release in: English