वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

घाऊक किंमत निर्देशांकात 0.8 टक्क्यांनी वाढ

प्रविष्टि तिथि: 14 MAY 2019 1:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मे 2019

 

 

घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याच्या निर्देशांकात एप्रिल महिन्यात, आधीच्या महिन्याशी तुलना करता 0.8 टक्के वाढ झाली आहे.

प्राथमिक वस्तूंच्या महत्वाच्या गटाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 3.3 टक्के वाढ झाली आहे. खाद्य गटाच्या निर्देशांकात 3.4 टक्के वाढ तर अखाद्य गटाच्या निर्देशांकात 2.6 टक्के वाढ झाली. खाण गटाच्या या निर्देशांकात 5.3 टक्के वाढ झाली. इंधन आणि ऊर्जा क्षेत्राच्या निर्देशांकात 0.5 टक्के घट झाली आहे. उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक मात्र गेल्या महिन्याच्या 118.3 टक्क्यावरच कायम राहिला.

 

N.Sapre/J.Patankar/P.Malandkar

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1571971) आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English