संरक्षण मंत्रालय
अमेरिकेचे नौदल प्रमुख ॲडमिरल जॉन एम. रिचर्डसन यांची भारत भेट
Posted On:
13 MAY 2019 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2019
अमेरिकी नौदलाचे प्रमुख ॲडमिरल जॉन एम. रिचर्डसन 12 ते 14 मे 2019 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. या भेटीदरम्यान ते भारत आणि अमेरिका नौदलांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे तसेच सहकार्याचे नवे मार्ग विकसित करण्यावर भर देतील.
ॲडमिरल रिचर्डसन यांनी आज नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांच्याशी चर्चा केली. तसेच संरक्षण विभागाचे सचिव, लष्कराचे उप-प्रमुख, हवाई दल प्रमुख तसेच राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सचिवांशीही चर्चा केली.
‘मलाबार’ आणि ‘रिमपॅक’ या सारख्या नौदल कवायतींच्या माध्यमातून भारतीय आणि अमेरिकन नौदल नियमितपणे एकत्रित कार्य करतात तसेच दोन्ही देशांच्या नौदलातील तज्ञांची देवाण-घेवाणही केली जाते. 2016 मध्ये अमेरिकेने भारताला महत्वपूर्ण संरक्षण भागीदार म्हणून मान्यता दिल्यानंतर दोन्ही देशातले संबंध लक्षणीयरित्या सुधारले आहेत.
ॲडमिरल रिचर्डसन यांच्या भेटीदरम्यान, नौदल कार्यप्रणाली आणि सराव, प्रशिक्षण, माहितीची देवाण-घेवाण, क्षमता निर्मिती आदी महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.
N.Sapre/J.Patankar/P.Malandkar
(Release ID: 1571925)
Visitor Counter : 102