वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतातून मिरची पावडर निर्यातीसाठीच्या करारावर भारत आणि चीन यांच्यात स्वाक्षऱ्या
प्रविष्टि तिथि:
09 MAY 2019 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2019
कृषी उत्पादनांना मंजुरी देण्यासंदर्भात भारताच्या प्रलंबित विनंतीशी संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी वाणिज्य सचिव अनुप वाधवान आणि चीनचे सामान्य शुल्क प्रशासन उपमंत्री ली गुओ यांच्यात आज नवी दिल्लीत बैठक झाली. बाजारपेठ प्रवेशासंदर्भातल्या मुद्यांचे जलदगतीने निराकरण करण्याला दोन्ही पक्षांनी मान्यता दिली. या बैठकीच्या समाप्तीपूर्वी भारतातून चीनमध्ये मिरची पावडर निर्यात करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
N.Sapre/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1571795)
आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English