संरक्षण मंत्रालय
स्कॉर्पिन वर्गातल्या ‘वेला’ या पाणबुडीचे जलावतरण
Posted On:
06 MAY 2019 5:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2019
स्कॉर्पिन वर्गातल्या ‘वेला’ या चौथ्या पाणबुडीचे आज मुंबईत जलावतरण झाले. संरक्षण (उत्पादन) सचिव डॉ. अजय कुमार यांच्या पत्नी वीणा अजय कुमार यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. माझगांव डॉक शिपबिल्डर्सने भारतीय नौदलासाठी ही पाणबुडी बांधली आहे.
भारतीय नौदलात ही पाणबुडी समाविष्ट करण्यापूर्वी बंदरात आणि समुद्रातही या पाणबुडीच्या कठोर चाचण्या घेण्यात येतील.
स्कॉर्पिन श्रेणीतल्या सहा पाणबुड्या बांधण्यासाठी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी फ्रान्समधल्या नेव्हल ग्रुपशी करार झाला आहे.
माझगांव गोदीत सध्या आठ युद्ध नौका आणि पाच पाणबुड्या बांधण्याचे काम सुरु आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1571644)
Visitor Counter : 204